‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमांमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्ननगरीत आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अंशुमन विचारेने नुकतंच मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. परंतु, सध्या त्याच्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे. अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शन साइटला पत्नीसह भेट दिली होती. “नवं घर लवकरच…खूप खूप वाट पाहात आहोत.” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “पिवळ्या रंगाची नऊवारी…”, पूजा सावंतने पहिल्यांदाच सांगितले लग्नाचे प्लॅन्स, म्हणाली, “मला मुंबईत…”

अंशुमनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन…”, “जबरदस्त मित्रा…”, दादा-वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. गेल्या वर्षभरात प्रसाद खांडेकर, मयुरी वाघ, पृथ्वीक प्रताप, अक्षय केळकर, स्मिता शेवाळे, धनश्री काडगावकर या कलाकारांनी नवीन घर करत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर उपेंद्र लिमयेंच्या लेकाची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला, “बाबा तुला…”

दरम्यान, अंशुमन विचारने आतापर्यंत ‘पोश्टर बॉईज’, ‘धिंगाणा’, ‘संघर्ष’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘श्वास’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अभिनेता सध्या ‘राजू बन गया Zentalman’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. पुढच्या वर्षी तो नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anshuman vichare bought new house in mumbai shares first glimpse of construction site sva 00