यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट. पण प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. आधी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२४ रोजी ‘पुष्पा २: द रुल’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील गाणी सध्या सगळ्यांच्या ओठांवर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा-पुष्पा’ आणि ‘सूसेकी’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पहिल्या ‘पुष्पा-पुष्पा’ गाण्यात फक्त अल्लू अर्जुन पाहायला मिळाला होता. पण दुसऱ्या ‘सूसेकी’ गाण्यात अल्लूसह रश्मिका मंदाना दिसली. या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या गाण्यातील हूकस्टेपची सगळ्यांना भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनेक कलाकार मंडळींचा ‘सूसेकी’ गाण्यावर केलेला डान्स तुम्ही पाहिलाच असेल. पण तुम्ही या गाण्यावरील अर्धवटराव व आवडाबाईचा डान्स पाहिलात का?

हेही वाचा – मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे समीर विद्वांस लवकरच चढणार बोहल्यावर; ‘या’ मराठी कलाकारांनी केलं केळवण

‘बोलक्या बाहुल्यांना’ बोलते करणारे शब्दभ्रमकार रामदास व अपर्णा पाध्ये यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी अर्धवटराव व आवडाबाईचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “अर्धवटराव व आवडाबाई हे सुप्रसिद्ध बाहुली जोडपं रामदास पाध्ये यांनी दूरदर्शनवर खूप गाजवलं. अर्धवटराव हा बाहुला रामदास पाध्ये यांच्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांनी १९१७ साली घडवला व तो भारतातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक बदलांचा साक्षी आहे. त्याने त्याच्या खास शैलीत या सर्व बदलांवर टिप्पणी केली आहे. २०२४ च्या डिजिटल युगात तो आता युट्यूब शॉर्ट्स व इन्स्टाग्राम रील्सवर येत आहे. या व्हिडीओमध्ये अर्धवटराव व आवडाबाई ‘सुसेकी’ या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत आहेत.”

या व्हिडीओत, अर्धवटराव व आवडाबाई ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या फ्युजन गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: आमिर-करीनाच्या गाण्यावर भर रस्त्यात थिरकले सखी गोखले-आशय कुलकर्णी, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

अर्धवटराव व आवडाबाईच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “तात्या विंचू फॅन क्लब तर्फे तात्या नाचलेच पाहिजेत”, “तात्या काकांना आणा”, “पुढचा व्हिडीओ तात्या विंचू झाला पाहिजे”, “तात्या विंचू कुठेय अर्धवटराव?”, “मस्त”, “अर्धवटराव किती गोड नाचतात…”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.