Ashi Hi Banwa Banwi Marathi Movie : ‘अशी ही बनवाबनवी’ हा मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. २३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत या सदाबहार चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. सचिन पिळगांवकरांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांच्यासह या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘झपाटलेला ३’ या सीक्वेल चित्रपटांची लाट आलेली असताना ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग सचिन पिळगांवकर बनवणार का याबद्दल त्यांना नेहमी विचारलं जातं. नुकत्याच ‘रेडिओ सिटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग बनवणं शक्य नाही असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
loksatta readers feedback
लोकमानस: अर्थकारणाच्या विकेंद्रीकरणातून ‘संघराज्य’
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!

हेही वाचा : वरईचा भात, साबुदाणा खिचडी अन्…; देशमुखांच्या घरी आषाढी एकादशीचा उत्साह! जिनिलीयाने लातूरमधून शेअर केला व्हिडीओ

‘अशी ही बनवाबनवी’च्या दुसरा भागाबद्दल सचिन पिळगांवकर म्हणाले…

सचिन पिळगांवकर म्हणाले, “‘अशी ही बनवाबनवी’च्या दुसरा बनवणं शक्य नाही कारण, लक्ष्या आता नाही आहे. त्याच्याशिवाय आता मी तो चित्रपट बनवू शकत नाही. लक्ष्या, सुशांत ( सिद्धार्थ रे ), सुधीर जोशी, लेखक वसंत सबनीस, संगीतकार अरुण पौडवाल, गीतकार शांताराम नांदगावकर हे लोक आता आपल्यात नाहीत असे अनेक लोक आहेत ज्यांचं त्या चित्रपटासाठी खूप मोठं योगदान होतं. तेच लोक आता नाहीत तर, कसा मी त्या चित्रपटाला पुढे नेणार…यामुळे त्या चित्रपटाला हात न लावणं केव्हाही चांगलं आहे.”

“आपल्या हातात काही गोष्टी नसतात. त्या खूप पलीकडच्या असतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. हा चित्रपट मी बनवला आहे असं मी कधीच बोलू शकत नाही. तो चित्रपट आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन बनवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे.” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “माझी पंढरी सजली…”, म्हणत मराठी अभिनेत्याने दाखवली नव्या घराची झलक! वारकऱ्यांच्या प्रतिकृतीने सजवलं घर

sachin
सचिन पिळगांवकर

दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात सुप्रिया पिळगांवकर, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, नयनतारा, अश्विनी भावे, जयराम कुलकर्णी, विजू खोटे यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.