अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’च्या संपूर्ण स्टारकास्टने ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थित राहून दिलखुलास संवाद साधला…

अशोक सराफ यांनी नुकतंच त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. याबद्दल त्यांना ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “मी इतके दिवस हे अकाऊंट वगैरे सुरू करत नव्हतो कारण, मला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे एवढे दिवस मी हे टाळत होतो. पण, म्हटलं करून पाहूयात नेमकं हे काय आहे, कसं आहे…आता ‘अशी ही जमवा जमवी’ येतोय, या सिनेमाचं औचित्य साधत मी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलंय. माझं अकाऊंट माझी टीम सांभाळते. मला स्वत:ला त्यात फार असं काही करावंसं वाटत नाही. मी फक्त ते लोक काय-काय करतात हे पाहत असतो.”

पाहा संपूर्ण मुलाखत

दरम्यान, प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला ‘अशी ही जमवा जमवी’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे.