मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक म्हणून आशिष पाटीलला ओळखलं जातं. आजवर त्याने सोनाली कुलकर्णीपासून ते अमृता खानविलकरपर्यंत अशा सगळ्या आघाडीच्या अभिनेत्रींचा नृत्यदिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासाठीच त्याला मराठी कलाविश्वातील ‘लावणीकिंग’ म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत प्रचंड मेहनत करून आशिषने यशाचा हा पल्ला गाठला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिषचा नृत्यदिग्दर्शक होण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. सर्वांच्या विरोधात जाऊन त्याने आपली कला आणि आवड जोपासली. या सगळं मेहनतीच फळ त्याला मिळालं असून त्याचं स्वप्न अखेर सत्यात उरतलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आशिषने नवीन डान्स स्टुडिओ सुरू केल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : कुणीतरी येणार येणार गं! कार्तिकी गायकवाड लवकरच होणार आई, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ आला समोर

आशिष पाटीलने दोन दिवसांपूर्वी “कलांगण लवकरच…” अशी पोस्ट शेअर केली होती. यामुळे कलांगण म्हणजे नेमकं काय असेल याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या मराठमोळ्या कोरिओग्राफरचं स्वप्न पूर्ण झालं आहे. गोरेगावमध्ये त्याने डान्स स्टुडिओ सुरू केला आहे.

“नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज वास्तुपूजा पार पडल्यावर मी अभिमानाने तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की, मी माझा स्वत:चा डान्स स्टुडिओ सुरू केला आहे. यामुळे माझं वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलंय. याची झलक तुम्हा सर्वांबरोबर शेअर करून मला माझा आनंद द्विगुणित करायचा आहे. डान्स क्लासेस, रील्स शूटिंग, वर्कशॉप्स, सर्व प्रकारच्या रिहर्सलसाठी हे नवीन स्थान…गणपती बाप्पा मोरया आणि आई बाबांचे आशीर्वाद” अशी पोस्ट शेअर करत आशिषने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आशिषने शेअर केलेल्या व्हिडीओवर अमृता खानविलकर, प्रसाद ओक, सई रानडे, समृद्धी केळकर, ऋतुजा देशमुख अशा अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish patil started new dance studio and performed vastu pooja with parents shares video sva 00