अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा नवा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ, वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सोनाली कुलकर्णीला ‘या’ सुप्रसिद्ध मराठी गायकावर होता क्रश; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली, “दोघांची नावं सारखी…”

अशोक सराफ या उपक्रमाविषयी सांगताना म्हणाले, “मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही लहानशी भेट आहे. यामुळे त्यांना मदत झाली तर मला आनंदच आहे. निवेदिताची ही सगळी कल्पना आहे. मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही? म्हणून घाबरलो होतो परंतु, सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.”

हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात प्रसिद्ध हॉलीवूड रॅपरवर चाहत्याने फेकले ड्रिंक, संतप्त गायिकेने रागाच्या भरात माइक उचलला अन्…

‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’या उपक्रमाचे आयोजन २९ जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात पडद्यामागील २० ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजारांची मदत केली.

हेही वाचा : “तुला लहान मुलांमध्ये काय आवडतं?”, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर; म्हणाली, “त्यांच्या नाकातून शेंबूड…”

नव्या उपक्रमात भाऊ सुभाष सराफ याची साथ मिळाली आणि अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनी १० लाखांची मदत केल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. विद्या पटवर्धन, उपेंद्र दाते, बाबा पार्सेकर, अर्चना नाईक, वसंत अवसरीकर, दीप्ती भोगले, सुरेंद्र दातार, विष्णू जाधव, रवींद्र नाटळकर, नंदलाल रेळे, अरुण होर्णेकर, प्रकाश बुद्धिसागर, पुष्पा पागधरे, उल्हास सुर्वे, एकनाथ तळगावकर, सीताराम कुंभार, हरीश करदेकर, शिवाजी नेहरकर, किरण पोत्रेकर, वसंत इंगळे या २० ज्येष्ठ रंगकर्मींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok and nivedita saraf started new initiative for old artist and help them financially sva 00
Show comments