मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या वर्षासाठी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले आहे.

यावर्षी १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेला बायकोने दिलं खास सरप्राइज; लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट केली बाईक

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे.

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षित झाली ‘बाहुबली’ चित्रपटातील अवंतिका; धकधक गर्लच्या मनमोहक अदा पाहून चाहते भारावले

पुरस्कार विजेते

१. रोहिणी हट्टंगडी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जीवनगौरव पुरस्कार

२. अशोक सराफ – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जीवनगौरव पुरस्कार

३. गणेश तळेकर – लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार

४. प्रशांत जोशी – डॉ. न. अ. बरवे स्मृति पुरस्कार

५. दिपाली घोंगे – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत कै. कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार

६. शशांक लिमये – श्रीमती शिबानी जोशी पुरस्कृत कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृति पुरस्कार

७. विजय जगताप – शंकरराव भोसले पुरस्कृत बाळकृष्ण ध. भोसले स्मृति पुरस्कार

८. संजय देवधर – वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार

९. गोविंद गोडबोले – कालिंदी केळुस्कर पुरस्कृत, अ.सी. केळुस्कर स्मृति पुरस्कार

१०. अभिनय, कल्याण अभिजीत झुंजारराव

११. प्रणीत बोडके

१२. अशोक ढेरे

१३. सुनील बेंडखळे

१४. श्याम आस्करकर

१५. रितेश साळुंके

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf and rohini hattangadi awarded by marathi natya parishad jeevan gaurav award sva 00