मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अलीकडेच ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ व मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे सध्या मनोरंजनसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नुकतेच काही लोकप्रिय मराठी कलाकार अशोक सराफ यांच्या घरी गेले होते. सुनील बर्वे, लोकेश गुप्ते, वंदना गुप्ते असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते.

अशोक सराफ यांच्या घरी या सगळ्यांनी एकत्र मिळून सेलिब्रेशन करत एका नव्या प्रोजेक्टवर चर्चा केली. याचे काही फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाटीसाठी आहे आणि या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. ही नेमप्लेट नेमकी कशी आहे पाहूयात…

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली

हेही वाचा : ठरलं तर मग : मित्रासाठी काहीपण! चैतन्यचा ‘तो’ निर्णय ऐकून अर्जुनला बसला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कामगिरी केली होती. एवढंच नव्हे तर हा चित्रपट मराठी मनोरंजनविश्वातील सदाबहार चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. यामधील सगळे संवाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर असे मराठी कलाविश्वातील सुपरस्टार्स या चित्रपटामध्ये एकत्र झळकले होते. या चित्रपटात अशोक सराफ यांनी धनंजय माने ही भूमिका साकारली होती. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील “धनंजय माने इथेच राहतात का?” हा संवाद घराघरांत लोकप्रिय आहे. यावरूनच अशोक सराफ यांनी त्यांच्या घराच्या दारावर नावाची पाटी लावली आहे.

हेही वाचा : जाऊबाई जोरात! ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी-ऐश्वर्याची ‘पुष्पा’ स्टाइल जुगलबंदी, ‘सूसेकी’ गाण्यावर मजेशीर डान्स

सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट लक्ष वेधून घेते. यावर “धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ ( द वरजिनल हास्यसम्राट )” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत सुनील बर्वे यांनी “काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच राहतात!” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Story img Loader