ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या जितक्या त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात तितक्याचं त्या त्यांच्या विधानामुळेही चर्चेत असतात. अनेकदा त्या चालू घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असतात. नुकतीच सविता मालपेकर यांनी ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले.

अभिनेत्री सविता मालपेकर यांना या मुलाखतीमध्ये विचारलं की, तरुण वयात इंडस्ट्रीत आल्यानंतर कधी कास्टिंग काउचचे अनुभव आले का? याविषयी बोलताना सविता मालपेकर म्हणाल्या, “एकतर मी जेव्हा ‘डार्लिंग डार्लिंग’मध्ये आले तेव्हा राजा गोसावी वडिलांसारखे माझ्या पाठीमागे होते. नयनाबाई आणि राजा गोसावी यांनी मला खूप सांभाळं. दुसरं अशोक सराफ. त्या ग्रुपमध्ये मी खूप लहान होते. या इंडस्ट्रीत राहून मी सगळ्या व्यसनांपासून लांब आहे, कारण अशोक सराफ. मी यागोष्टीसाठी त्याचे आभार मानते.”

Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Sudha Murty touches Javed Akhtar feet video viral
Video: मंचावर सुधा मूर्ती पडल्या जावेद अख्तर यांच्या पाया; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संपूर्ण देश त्यांना…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Sudesh Lehri
घर विकलं, चपला बनवल्या, भाजीपाला विकला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कठीण काळ
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…

हेही वाचा – सविता मालपेकर यांना एका लोकप्रिय मालिकेदरम्यान दिला होता चॅनेल हेडने त्रास, प्रसंग सांगत म्हणाल्या, “अंतर्वस्त्र…”

“एकेदिवशी ‘डार्लिंग डार्लिंग’चा शंभरावा प्रयोग होता. त्यावेळेला शंभरावा प्रयोग म्हणजे पार्टी वगैरे असायची. ती पार्टी सिटी लाईटच्या इथे निलम हॉटेलमध्ये होती. सगळ्यांसमोर दारुचे ग्लास होते. मी नवीन, कोकणातून आलेली मुलगी होती. त्यामुळे पार्टी वगैरे हा प्रकार जास्त अनुभवला नव्हता. म्हणून मी सगळेजण येणार त्यामुळे मी पण दारुच्या ग्लासला हात लावला. समोर माझ्या अशोक बसला होता. फक्त माझ्याकडे बघून त्याने डोळ्यांनी नकार दिला. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे. अशोकने मला एक वाक्य सांगितलं होतं. कारण त्याला माहित होतं, मी कोणत्या परिस्थितीतून आलीये. गॉडफादर नाही. कुठल्या घराण्यातून आलीये. तर मला म्हणाला, तू ज्या घराण्यातून आली आहेस, जे संस्कार घेऊन आली आहेस आणि ज्याच्यासाठी आली आहेस, हे सगळं लक्षात ठेवायचं. मोहाचे खूप प्रसंग येतील. ज्यासाठी आली आहेस ते काम करायचं. या सगळ्यांपासून लांब राहायचं तरच जे ध्येय घेऊन आली आहेस, उत्तम अभिनेत्री होण्याचं ते घडू शकेल, नाहीतर ते घडणार नाही. हे इतकं डोक्यात बसलं. त्यामुळे मला कधीच मोह झाला नाही,” असं सविता मालपेकर म्हणाल्या.

Story img Loader