अशोक सराफ गेली अनेक दशकं आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पन्नासच्या वर हिंदी चित्रपट, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं  आतापर्यंत त्यांनी केली आहेत. आजही त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असतं. त्यांच्या कामाबरोबरच ते त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठीही ओळखले जातात. सर्वजण त्यांना ‘अशोक मामा’ अशी हाक मारतात. त्यांना मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली हे त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात उघड केलं होतं.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची दोन पर्वं यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व ४ जूनपासून सुरू होत आहे. याच निमित्ताने झी मराठीने या कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वाच्या एका एपिसोडची छोटीशी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्याचे दिसत आहे. “तुम्हाला मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली?” असा प्रश्न अवधूत गुप्तेने त्यांना विचारल्यावर अशोक मामांनी याचा खुलासा केला होता.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

आणखी वाचा : “मला अशोकमामा प्रेमाने ‘अशी’ हाक मारतो…”; प्रशांत दामले यांनी अनेक वर्षांनी उघड केलं होतं गुपित

ते म्हणाले होते, “कोल्हापूरकडे ‘मामा’ म्हणणं हे लोक खूप मानाचं समजतात. एका चित्रपटाचं तिथे शूटिंग करत असताना आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ…हे कोण? हे अशोक मामा. त्या लहान मुलीला मला मामा म्हणायला सांगताना तोच मला मामा म्हणू लागला. तिथे बाकी सगळे स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीही मला मामा म्हणायला सुरुवात केली. यानंतर मला इतके सगळे मामा म्हणून लागले की आता शूटिंग पाहायला आलेली लोकही मला मामा म्हणतात. लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं.”

हेही वाचा : अशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”

हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत नेटकरी हा व्हिडीओ आवडल्याचं सांगत आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाच्या आगामी पर्वासाठी उत्सुक असल्याचेही नेटकरी सांगत आहेत.

Story img Loader