मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. आज मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार मंडळींनी या दीपोस्तवाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, किरण शांताराम शिवाजी पार्क येथील रोषणाई पाहून भारावून गेले. यावेळी या सगळ्याच कलाकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं.

अभिनेते महेश कोठारे म्हणाले, “सर्वप्रथम सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. राज ठाकरे यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला आज एकत्र आणलं. ही एक सुंदर कल्पना आहे. आम्ही एक बटण दाबलं आणि संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला. शिवाजी पार्क अगदी उजळून निघाला आहे. असंच राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र उजळून काढतील अशी खात्री आहे.”

mess while taking sarees in Ladkya Bahinicha Deva Bhau program
लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्या घेताना गोंधळ
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “धर्मांबद्दल वाईट बोलणाऱ्यांना…”, अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर?
Ganesha Solapur, mandals welcomed ganesha,
सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत, शहरात १३५० मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना
Finance department, Gulabrao Patil,
अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?
Aditi Tatakare
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून वादंग; आदिती तटकरे म्हणाल्या, “एकनाथ शिंदे यांनीही…”
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”

त्याचबरोबरीने अशोक सराफ यांनीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबरीने राज ठाकरे यांच्या या अनोख्या संकल्पनेचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “तुम्हाला सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची जावो अशी मनोमन देवाजवळ प्रार्थना.”

आणखी वाचा – मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस एका मंचावर, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…”

पुढे ते म्हणाले, “आपण मराठी माणसं उत्साही आहोत. कोणत्याही गोष्टीमध्ये हार मानत नाही. राज ठाकरे यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम खरंच खूप चांगला आहे. लोकांचा उत्साह वाढवणारा आहे. राज ठाकरे यांच्यामुळे शिवाजी पार्क हा परिसर पुन्हा उजळून निघाला.” यावेळी इतरही काही मराठी कलाकारांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.