मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात चाहता वर्ग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अशोक सराफ छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना ‘अभिनय सम्राट’ म्हणून ओळखलं जात.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
अशोक सराफ यांची सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नाना पाटेकर यांच्याबरोबर असलेली घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत आहे. सध्या सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते नाना पाटेकर यांच्याबरोबरच्या मैत्रीचा किस्सा सांगताना दिसत आहेत.
हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणत एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…
हा व्हायरल व्हिडीओ ‘शेमारू मराठीबाणा’ला अशोक सराफ यांनी दिलेल्या मुलाखतीचा आहे. यामध्ये अशोक सराफ नाना पाटेकरांबरोबरच्या मैत्रीविषयी सांगतात की, “नाना पाटेकरबरोबरचा माझा सहवास फक्त आठ महिन्याचा होता. आम्ही एकत्र बरेच चित्रपट केले आहेत. पण त्याला सहवास म्हणता येणार आहे. मात्र आठ महिने आम्ही एकत्र ‘हमीदाबाईची कोठी’ नाटक केलं. त्या ‘हमीदाबाईची कोठी’मध्ये त्याची आणि माझी इतकी मैत्री झाली की ती अजूनही आहे. आणि तोही ते मानणारा असल्यामुळे ती मैत्री अजूनही टिकून आहे. त्याला माझा स्वभाव आवडला, मला त्याचा स्वभाव आवडला.
हेही वाचा – “आई-बाबा दोघेही गेले…”; अभिनेते अजिंक्य देव यांची नवी पोस्ट, रमेश देव आणि सीमा देव यांचे जुने फोटो केले शेअर
पुढे अशोक सराफ म्हणाले की, “तो खडूस वाटतो, पण तसा तो नाहीये. तो एकदम सरळ साधा माणूस आहे. फक्त स्पष्टवक्ता आहे. हा त्याचा एक गुण आहे. बाकी तो अतिशय मैत्रीसाठी मस्त माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात, असं म्हटलं तर तो पाहिजे ती मदत करायला केव्हाही धावू येईल. अंगावरचे कपडे काढून देणारा असा हा माणूस आहे.”