अभिनेते महेश कोठारे यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अजूनही महेश कोठारे यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांनी आता त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. महेश कोठारे यांचं ‘डॅमइट आणि बरंच काही’ पुस्तक प्रकाशित झालं आहे.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!

महेश कोठारे यांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महेश कोठारे यांच्या पुस्तकाचं कौतुक केलं. त्याचबरोबरीने सचिन पिळगांवकर, निवेदिता सराफ यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

अशोक सराफ यांची गैरहजेरी कारण…

संपूर्ण कोठारे कुटुंब तसेच कलाक्षेत्रामधीलही अनेक दिग्गज मंडळी महेश कोठारेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान अभिनेते अशोक सराफ यामध्ये गैरहजर होते. पण या कार्यक्रमाला न येण्यामागचं कारण काय? याबाबत निवेदिता सराफ यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “त्याच मुलीबरोबर तो…” शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा, लेकाच्या रिलेशनशिपबाबतही केलं भाष्य

निवेदिता सराफ म्हणाल्या, “आज अशोक इथे येऊ शकला नाही. त्याला लॅरेंजायटिस (laryngitis) झाला आहे. त्याला बोलताही येत नाही. म्हणून आम्हाला आमच्या नाटकांचे प्रयोगही आम्हाला रद्द करावे लागले. आज इथे या कार्यक्रमात तो नाही. पण तुझ्या (महेश कोठारे) पाठिशी एक मित्र व अभिनेता म्हणून तो नक्कीच उभा आहे.”