Navra Maza Navsacha 2 One Week Collection : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट पर्दर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आणि वीकेंडला चांगली कमाई केली. नंतर मात्र कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. आता चित्रपटाचे एका आठवड्याचे कलेक्शन किती झाले आहे? ते जाणून घेऊयात.

‘नवरा माझा नवसाचा २’ हा १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्या भागात नवस, बसचा प्रवास आणि नवस पूर्ण होताना घडलेल्या मजेदार घटना दाखवण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या भागात नवीन नवस आहे, पण प्रवास मात्र ट्रेनचा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाने सात दिवसांत किती कमाई केली आहे, त्याची आकडेवारी समोर आली आहे.

“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने १.२० कोटी रुपये कमावले. चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई १.१ कोटी, सहाव्या दिवसाची कमाई ९५ लाख रुपये होती. तर सातव्या दिवशी चित्रपटाने एक कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे सात दिवसांचे कलेक्शन आता १२.३५ कोटी रुपये झाले आहे.

“हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अभिजीतची भेट घेतल्यावर पत्नी शिल्पाची पहिली पोस्ट! म्हणाली, “इतक्या दिवसांनंतर…”

‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत.