मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’नंतर आता पुन्हा एकदा मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, मंगेशकर कुटुंबीय, चिन्मय मांडलेकर असे बरेच मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर अशोक सराफ यांनी उपस्थित मान्यवरांसमोर भावनिक भाषण केलं.

अशोक सराफ म्हणाले, “आता माझ्याबरोबर या मंचावर सगळे थोर कलावंत बसलेले आहेत. यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. आता मला आठवतही नाही आणि मोजताही येत नाही. पण, आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. मी एक कलाकार आहे आणि एका असमान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळतोय आणि आज इथे एक मोठा असामान्य नट देखील उपस्थित आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे.”

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा : Video : २७ वर्षांनी पुन्हा रंगली ‘पूजा’ अन् ‘निशा’ची जुगलबंदी, माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

“हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नसून तुम्हा सर्वांचा आहे. कलाकार त्याच्या परीने वेगवेगळे प्रयोग करत असतो. पण, ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर, त्याचा काहीच उपयोग नसतो. पण, मी केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आज मी माननीय हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानतो की, त्यांनी मला या पुरस्काराच्या लायक समजलं. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या हृदयात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

हेही वाचा : रिअ‍ॅलिटी शो खरंच करिअर घडवतात का? अवधुत गुप्तेने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “शोनंतर संबंधित स्पर्धकाला…”

दरम्यान, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

Story img Loader