महिलांच्या अडचणींवर आणि त्यांच्या प्रेरणादायी कथेवर आधारित असलेल्या चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ असो किंवा ‘झिम्मा २’ महिलांवर आधारलेले चित्रपट सुपरहिट ठरतं आहेत. अशातच महिला दिनाचं औचित्य साधून अनेक मराठी चित्रपटांची घोषणा केली जात आहे. केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तर अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे अभिनीत ‘गुलाबी’ या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विचारांचा, वागणुकीचा, स्वप्नांचा आणि नात्यांचा ‘गुलाबी’ प्रवास लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘गुलाबी’ या चित्रपटाची घोषणा महिला दिनानिमित्ताने करण्यात आली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काल, ७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासंदर्भातली पोस्ट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर शेअर करत अभिनेत्रींनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या मोशन पोस्टरमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी व श्रुती मराठे हटके अंदाजात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: राधिका मर्चंटने हॉलीवूड चित्रपटातील संवाद केले कॉपी! नेटकरी म्हणाले, “आता हिला आरामात…”

हेही वाचा –Video: अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा शाहरुख खानसह ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “राधिका…”

अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी व श्रुती मराठे या व्यतिरिक्त सुहास जोशी, शैलेश दातार, निखिल आर्य, राधिका देशपांडे, प्रदीप वेलणकर, पूजा पुरंदरे हे कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात असून चित्रीकरणाला मात्र सुरुवात झाली आहे.