बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. तर सना शिंदेंने शाहीर साबळेंच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेही या चित्रपटात झळकली आहे.

अश्विनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नी माई यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत अश्विनीने खास पोस्टही लिहिली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामध्ये मी ज्यांची भूमिका साकारली आहे त्या “माई”. मी भारावून गेले जेव्हा मी स्वतःला रुपेरी पडद्यावर पाहिले,” असं अश्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हिंदी अभिनेत्रीलाही भुरळ, देवोलिना भट्टाचार्जीचा व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणते, “महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा एक भाग होणे ही मला भाग्याची गोष्ट वाटते. रसिक मायबाप प्रेक्षक, आम्ही प्रत्येकाने आमचे आमचे १००% देण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न यशस्वी झाला की नाही, हे मात्र तुम्ही सांगण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जावून तुम्ही ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहा.”

हेही वाचा>> Video : “अर्ध आयुष्य संपलं, पण…” सहा बहिणींची अनोखी गोष्ट, केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने साकारलेली रानू अक्का ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader