‘वरण भात लोणचं कोण नाय कोणाचं’, ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘पछाडलेला’, ‘व्हॅलेनटाईन्स डे’ अशा चित्रपट, वेब सीरीजमधून अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी(Ashwini Kulkarni)ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने मराठी इंडस्ट्रीबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. महिलांना पडद्यावर चांगल्याप्रकारे दाखवलं गेलं नाही, असं वक्तव्य अभिनेत्रीने केले. नेमकं ती काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊयात.

अंकुश चौधरीने सई ताम्हणकरला…

अश्विनी कुलकर्णीने नुकतीच ‘द पोस्टमन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मराठी इंडस्ट्रीबाबत वक्तव्य केले. मराठी चित्रपट का चालत नाहीत, त्याची कारणं काय आहेत. याबरोबरच अभिनेत्री असेही म्हणाली, “मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट फिमेल्स प्रेझेंटच करता आलेल्या नाहीत. अंकुश चौधरीने सई ताम्हणकरला ‘नो एन्ट्री’मध्ये दाखवलं होतं. ते उत्तम होतं. त्याच्यानंतर कुठे काय? त्यानंतर वरण भात लोणचं कोण नाय कोणाचं या चित्रपटात मीच एक सरप्राइज एलिमेंट होते. शांत व्यक्तीमत्वामधून दिसणारा हॉटनेस होता. पण, मराठी इंडस्ट्रीमध्ये उंच, हॉट, बोल्ड, सुंदर बायका ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला हव्यात, त्या कोणी केलेल्या नाहीत. ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. बॉलीवूडपेक्षा मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी जास्त आवडते.”

“आपल्या सगळ्यांना माहितेय की ऐश्वर्या राय किती सुंदर आहे. मणिरत्नम सरांच्या पीएस १(पोन्नियिन सेलवन) आणि पीएस २ मध्ये ऐश्वर्या रायला काय दाखवलं आहे. त्यात ती अत्यंत सुंदर दिसते. हीच ऐश्वर्या राय धूम २ मध्ये होती. किती बोल्ड होती. एक स्त्री किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे सुंदर दिसू शकते. हे मराठी इंडस्ट्रीला, मराठी निर्मात्यांना कळलं नाहीये, असं मला वाटतं. किंवा मग मराठी स्त्री म्हणजे सोशिकच असली पाहिजे. ती बंडच करूनच उठली पाहिजे. एकतर ती बंड करणारी असते किंवा सोशिक असते. त्याच्यामध्ये तिचं स्त्रीत्व अजून म्हणावं तसं दाखवलं गेलं नाहीये, असं वाटतं.”

या सगळ्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, “तसे सीन्स करायची गरज नसते. पोन्नियन सेल्व्हन २ मध्ये ऐश्वर्या राय हॉट दिसते. पण ती राणीसुद्धा आहे. ती कमालीची सुंदर दिसते. एक तर तुम्ही थिल्लर आणि खालच्या दर्जाचं दाखवाल. प्रत्येक वेळेला सई सारखं कोणी बिकनी घातली पाहिजे, असं काही गरजेचं नाही. एखादी स्त्री साडीमध्येसुद्धा हॉटच दिसते. तुम्ही तिला तशी भूमिका द्या. तिला तसं प्रेझेंट करा. म्हणजे हेच मराठी वेब सीरीजमध्ये चांगल्या प्रकारे दिसायला लागलं आहे.”