आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या अंतिम सामन्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मोहम्मद सिराजच्या आक्रमक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. सध्या जगभरातून या भारतीय गोलंदाजाचं कौतुक करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘जवान’मध्ये थलपती विजयचा कॅमिओ का नव्हता?, दिग्दर्शक अ‍ॅटलीने सांगितलं खरं कारण; म्हणाला, “दुसरा भाग…”

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने भारतीय संघाने अंतिम सामन्यात केलेली दमदार कामगिरी पाहून खास पोस्ट शेअर केली आहे. मोहम्मद सिराजची आक्रमक गोलंदाजी पाहून अभिनेता थक्क झाला होता. “भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना : आमच्या पप्पांनी श्रीलंकेला ‘हाणला’-शेजारी.” असं सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : करण जोहरला मिळालेली अंडरवर्ल्डकडून धमकी, शाहरुख खानने मित्राला दिली ‘अशी’ साथ; म्हणाला, “बंदुकीच्या गोळ्या…”

सिद्धार्थप्रमाणे विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने सुद्धा मोहम्मद सिराजचं भरभरून कौतुक केलं आहे. “क्या बात है..मिया मॅजिक” असं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या मृणाल ठाकूरचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत डंका! कोरलं ‘या’ मानाच्या पुरस्कारावर नाव

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने १० विकेट्सने विजय मिळवत ‘आशिया चषक २०२३’चं विजेतेपद आपल्या नावं केलं आहे. याशिवाय या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने अवघ्या १६ चेंडूत ५ विकेट घेत नवा विक्रम केला आहे. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केला नव्हती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup final 2023 india vs sri lanka marathi actor siddharth jadhav praised mohammed siraj and team india sva 00