Avadhoot Gupte New Home : अलीकडच्या काही दिवसांत बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी नवीन घरं खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आलिशान घरं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीच्या मुहूर्तावर अमृताने ३ बीएचके फ्लॅट खरेदी केला. तर, सईच्या प्रशस्त घराची चर्चा नेहमीच होत असते. आता या पाठोपाठ लोकप्रिय गायक अवधूत गुप्तेने देखील नवीन घर खरेदी केलं आहे.

मराठी कलाविश्वातील आघाडीचा गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवधूतने खार परिसरात नवीन घर खरेदी केलं आहे. खार पश्चिम येथे तब्बल ७ कोटी ७५ लाखांचं आलिशान घर अवधूतने घेतलं आहे. अवधूत अन् त्याची पत्नी गिरिजा गुप्ते या दोघांनी मिळून हे घर खरेदी केलं आहे. SquareYards ने दिलेल्या मालमत्तेच्या नोंदणी दस्तऐवजानुसार तसेच हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे घर मुंबईतील खार परिसरात रुस्तमजी पॅरामाउंट नावाच्या इमारतीमध्ये १६व्या मजल्यावर आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अवधूत गुप्तेने ( Avadhoot Gupte ) नव्या घराचा व्यवहार १६ ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गायकाने या घरासाठी ४६ लाख ४८ हजार इतकी स्टॅम्पड्युटी भरली असून ३० हजार रुपये नोंदणीशुल्क भरलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी खार परिसरात घर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण, सलमान खान, रणबीर कपूर, आमिर खान, क्रिकेटपटू के.एल. राहुल व त्याची पत्नी अथिया शेट्टी असे मोठमोठे सेलिब्रिटी या अपार्टमेंटच्या जवळपासच्या परिसरात राहतात.

हेही वाचा : “दोन्ही वर्षी पुरस्कार मिळाला नाही, थोडं हिरमुसल्यासारखं…”, ऐश्वर्या नारकरांनी हुकलेल्या अवॉर्डवर मांडलं मत, म्हणाल्या…

दरम्यान, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेला ( Avadhoot Gupte ) ओळखलं जातं. याशिवाय गेल्या काही वर्षांत अवधूत हा रिअ‍ॅलिटी शोचा परीक्षक म्हणून देखील नावारुपाला आला आहे. त्याने स्पर्धकांना दिलेलं प्रोत्साहन, त्याच्या शो दरम्यानच्या उत्साह वाढवणाऱ्या कमेंट्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आवडतात. आता या नव्या घरात अवधूत केव्हा शिफ्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader