मराठी सिनेसृष्टीतील ९०च्या दशकातील एक मराठमोळं लोकप्रिय कपल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतं. हे कपल म्हणजे नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दोघं नवनवीन रील्स, फोटो शेअर करत असतात. यामुळे ते बऱ्याचदा ट्रोल होतात. पण ट्रोलर्स देखील सडेतोड उत्तर देऊन स्वतःचं आयुष्य आनंदाने जगत असतात. नारकर कपल फक्त डान्स रील्स नाही, तर योगाचे रील्स देखील शेअर करत असतात. नुकतीच एक ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आवडतं पुस्तक, नाटक अन् बरंच काही; ‘हा’ जुना व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “लक्ष्या मामा….”

ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्याबरोबरचा रील शेअर केला आहे. ‘हारे हारे…’ या गाण्यावरील त्यांचा हा रील आहे. या रीलवर लिहीलं आहे की, “जेव्हा तुम्ही डान्सर नसता.” हा नवा रील शेअर करत ऐश्वर्या यांनी एक सुंदर कॅप्शन लिहीलं आहे.

हेही वाचा – ‘या’ तीन निकषांवर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची निर्माती श्रुती मराठे स्वीकारते काम; म्हणाली…

कॅप्शनमध्ये अभिनेत्रीनं लिहीलं आहे की, “डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता. पण या रील्सच्या ट्रेंडने मला फक्त शरीराच्या हालचाली करून आनंदी राहण्यापेक्षा डान्स करण्यात कंफर्टेबल केलं… हे त्या लोकांसाठी नाही जे म्हणतात “ह्या वयात काय हे?”… कोणी काय करावे आणि काय करू नये हे कोणीही कोणासाठी ठरवू शकत नाही… तुम्हाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टींबरोबर तुम्ही पुढे जावं. हे तुमचं आयुष्य आहे आणि ते पूर्णपणे जगा.”

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “लज्जास्पद…”

दरम्यान, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच त्या ‘स्टार प्लस’वरील नवी हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash narkar and aishwarya narkar new reel goes viral on social media pps