९०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अजूनही त्याचे लाखो चाहते आहेत. या दोघांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये एकत्र काम केलं आहे. असं हे लोकप्रिय नारकर कपल सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत असतं. त्यांचा प्रत्येक व्हिडीओ व्हायरल होत असतो. नुकताच त्यांनी नवा व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगला चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘ताली’मधील सुव्रतच्या लूक टेस्टची सासूबाईंनी सांगितली गंमत; शुभांगी गोखले म्हणाल्या, “साडी आणि ब्लाउज…”

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच दोघांनी बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या ‘Kyun Karu Fikar’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहील आहे की, “जो भी होगा देखा जायेगा”

हेही वाचा – नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खातानाचा अभिनेता सुव्रत जोशीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “हा जेवणाचा….”

या व्हिडीओत अविनाश आणि ऐश्वर्या नारकर मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स काही नेटकऱ्यांना आवडला आहे, तर नेटकऱ्यांना खटकला आहे. त्यामुळे व्हिडीओच्या खाली नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

एका नेटकरीनं लिहील आहे की, “पागल झालेत दोघे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहील आहे की, “नारकर साहेब शरीबरोबर तोंडानेही मनसोक्त नाचतात.” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहील आहे की, “आयुष्य एकदाच मिळत.. भरभरून जगून घ्यावे.” याशिवाय चौथ्या नेटकऱ्यानं अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांना संतुर जोडी असं म्हटलं आहे.

हेही वाचा – “स्मृतिभ्रंश हा एक असा आजार…” सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या सासूबाई…”

दरम्यान, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच त्या ‘स्टार प्लस’वरील नवी हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash narkar and aishwarya narkar new video goes viral pps
Show comments