School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर येथे दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व लहान मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. बदलापूरच्या नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात ४ व ६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांच्या संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळासह मनोरंजनविश्वातील कलाकारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बदलापूरमध्ये चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी शेअर करत प्रिया बापट लिहिते, “माझं रक्त खवळतंय, आता ही कोणा एकाची लढाई नाहीये. याठिकाणी स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” तर प्रसाद ओकने याप्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा असं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

Badlapur School Case – प्रिया बापट पोस्ट

हेही वाचा : Badlapur School Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले…

Badlapur School Case – शिवाली परब पोस्ट

मराठी कलाकार संतापले

अभिनेत्री शिवाली परबने “हँग द रेपिस्ट…” अशी पोस्ट शेअर करत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी असं म्हटलं आहे. अभिजीत केळकरने याप्रकरणी, “जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे…त्याला शिक्षा तरी मानवी का असावी? असा प्रश्न पोस्ट शेअर करत उपस्थित केला आहे.” यापूर्वी, अभिज्ञा भावे, ओंकार राऊत, क्षितीज पटवर्धन, ऐश्वर्या नारकर, क्षितीजा घोसाळकर, सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील कोलकाता बलात्कार प्रकरणी संतापजनक पोस्ट शेअर करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.

Badlapur School Case – अभिजीत केळकर पोस्ट

हेही वाचा : Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर प्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; पोलिसांना म्हणाले, “मुळात या घटनेत…”

दरम्यान, बदलापूरच्या या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur school case two girls sexually abuse marathi celebraities demand jutice sva 00