Badlapur Sexual Assault Case : कोलकातामधील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याचं प्रकरण ताज असतानाच बदलापूरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी संतप्त बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहे. आज सकाळपासून बदलापूरमधील नागरिक शाळेबाहेर आणि रेल्वे स्थानकात आंदोलन करत आहेत. बदलापूर परिसरातील वातावरण प्रचंड तापलं आहे. मराठी कलाकार मंडळी देखील याप्रकरणावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, अभिजीत केळकर, नेहा शितोळे यांनी सोशल मीडियाद्वारे बदलापूर प्रकरणावर ( Badlapur Sexual Assault Case ) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री सुरभी भावे ( Surabhi Bhave ) हिने देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संतप्त पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “बायकांना हडतूड करणारे…”, अरबाज पटेलच्या ‘त्या’ कृत्याचा मराठी अभिनेत्याने केला निषेध; म्हणाला, “केकाटणारे मर्द…”

अभिनेत्री सुरभी भावेने लिहिलं आहे की, बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार!…एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग…माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित…त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असे याची कल्पना सुद्धा करवत नाहीये…कधी अशा आरोपींना थेट मृत्यू शिक्षा होईल देव जाणे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापूर प्रकरणावर काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसंच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणं गरजेचं आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीच्या निर्णयामुळे ‘ए’ टीममध्ये पडली फूट, वैभव-घनःश्यामने उठवला आवाज, म्हणाले, “हिच्या वागण्यामुळे टीमचा घात”

दरम्यान, सुरभीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ मालिकेत काम करत आहे. याआधी सुरभी ‘राणी मी होणार’ मालिकेत झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault case surabhi bhave share angry post about badlapur case pps