केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात झाली. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून तो विक्रमी कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ३७.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अशातच केदार शिंदेंनी कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम लिहित पत्नी आणि मुलीबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील काही दिवसांपासून केदार शिंदे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका निभावणाऱ्या कलाकारांविषयी सोशल मीडियावर लिहित आहेत. आज त्यांनी पत्नी बेला शिंदे आणि मुलगी सना विषयी खास पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदेंनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, “२०१९ पासून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला हँडल करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण क्रिएटिव्ह असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणीमुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि चित्रपटाची निर्मिती! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे. तिनं नेहमी मला धीर देण्याचं काम केलंय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे.”
हेही वाचा – घोरपड, साप हातात घेऊन मिसेस उपमुख्यमंत्री सांगतायत कोणता प्राणी सर्वात विषारी?; नेटकरी म्हणाले, “घरातच…”
“…आणि माझी सना. या चित्रपटाच्या प्रोजेक्ट रिपोर्टपासून सगळ्याची जबाबदारी तिने सांभाळली. या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला तो सनामुळे. सहा अभिनेत्रींना मेकअप रूममधून सेटवर आणायचं महत्त्वपूर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे, हे इथे लिहून समजणार नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर केलेला हा चित्रपट. पण, त्यात सना आत्मविश्वासाने भूमिका करू शकली ते या सहा अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता. आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे, त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण, कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम; त्यामुळे हे घडलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय,” अशी केदार शिंदेंनी पोस्ट केली आहे.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री
बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात दुप्पट कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं १२.५० कोटींची, तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींची कमाई केली. आता येत्या काळात हा चित्रपट कोणते नवे विक्रम रचतोय हे पाहू.