सहा बहिणींच्या जीवनावर आधारित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करीत आहे. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाची कामगिरी निभावणाऱ्या दोन व्यक्तींचे आभार मानले आहेत.

साऊंड रेकॉर्डिस्ट अतुल देशपांडे आणि कला दिग्दर्शक महेश कुडाळकर या दोघांचे केदार शिंदेंनी आभार मानले आहेत. तसेच त्यांनी या दोघांबद्दल लिहिलं आहे की, “‘बाईपण भारी देवा’ मी रिअल लोकेशनवर शूट केलं आहे. त्यामुळे या दोघांचीही कामगिरी महत्त्वाची होती. जी घरं आम्ही निवडली ती अत्यंत छोटी. कॅमेरा ठेवला तर जागा मिळायची नाही. त्यात फ्रेममध्ये सहा जणी. पण हे दिव्य कला दिग्दर्शक म्हणून उत्तम सांभाळलं. खूप आभार. अतुल माझ्याबरोबर पहिल्या चित्रपटापासून काम करतोय. त्यामुळे अडीअडचणी आल्यावर मार्ग न सांगता तो काढायचा. सहा जणींचं चित्रपट संपल्यावर डबिंग फार महत्त्वाचं होतं. त्या भावभावनांचा परिणाम तसाच यायला हवा होता. अतुलनं तिथे सुद्धा चोख भूमिका बजावली.”

हेही वाचा – “लग्न हा एक खेळ” अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असं का म्हणाला?, पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

दिग्दर्शक केदार शिंदे हे मागील काही दिवसांपासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कलाकारांविषयी खास पोस्ट शेअर करत आहेत. या चित्रपटानं अवघ्या १० दिवसांत २६.१९ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

रविवारी, ९ जूनला बॉक्स ऑफिसवर एका दिवसात विक्रमी कमाई केल्यानंतर केदार शिंदे म्हणाले, “रसिकहो, आपण हा विक्रमसुद्धा आपल्या नावे केलात. तुमचं मनापासून अभिनंदन! तुम्ही ठरवाल तेच होणार. पण एक सांगू? याचा अभिमान नक्कीच आहे. तरीही येणाऱ्या कुठल्याही नव्या मराठी चित्रपटानं हा विक्रम लवकरात लवकर मोडावा हीच स्वामीचरणी प्रार्थना! तरच मराठी सिनेमा झंझावात निर्माण करील.”

Story img Loader