केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. नुकतंच एका १०५ वर्षांच्या आजींनी हा चित्रपट पाहिला आणि तो कसा वाटला, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

केदार शिंदेंनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक १०५ वर्षांच्या आजी दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

“मला हा चित्रपट खूप खूप आवडला. तुम्हाला माझा आशीर्वाद. तुम्ही खूप खूप मोठे व्हा आणि असेच पुढे जात राहा”, असे त्या आजींनी म्हटले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “बाईपण भारी दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं…”; अशोक सराफ यांचं स्पष्ट वक्तव्य

“आणखीन काय हवंय आयुष्यात? वय वर्षे १०५.. थिएटर मध्ये येऊन सिनेमा पाहिला. आणि त्याची प्रतिक्रिया सुध्दा कळवली. आजी ROCKS”, असे कॅप्शन केदार शिंदेंनी या व्हिडीओला दिले आहे.

केदार शिंदेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर सुकन्या मोने आणि सावनी रविंद्र या दोघींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोघींनीही हार्ट आणि हात जोडण्याचे इमोजी शेअर करत यावर कमेंट केली आहे.

Story img Loader