केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट चांगलाच गाजला. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील काही अभिनेत्री परदेशात फिरायला गेला आहे. या अभिनेत्रींनी सोशल मीडियावरून या सहलीचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक्ता असते. कलाकार मंडळीही सोशल मीडियावर नेहमीच आपले निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी सध्या थायलंडला फिरायला गेल्या आहेत. सुचित्रा बांदेकर यांनी या ट्रीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री समुद्राजवळच्या एका रेस्टोरंटमध्ये बसलेल्या दिसून येत आहे. “पाहा, आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत” या व्हिडीओमध्ये या अभिनेत्री क्रूजवर धमाल मस्ती करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन ५ महिने झाले. मात्र, चाहत्यांमध्ये अद्याप या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या कथेबरोबर गाणीही चांगलीच गाजली. या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला.