सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्रींनी सहा बहिणींची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता शिल्पा नवलकरने एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
जिनिलीयाला मिळालेला नाव बदलण्याचा सल्ला, ‘हे’ सुचवलेलं नाव; म्हणाली, “मला प्रत्येकजण…”
शिल्पा नवलकरची मुलगी कुहूने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला शिल्पा नवलकर व तिच्या पतीने हजेरी लावली. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. तसेच फोटोही शेअर केले. “जेव्हा मुलगी ग्रॅज्युएट होते” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
शिल्पाने शेअर केलेल्या या फोटोवर चित्रपटातील साधना म्हणजे सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हर्षदा खानविलकर, मेघा धाडे यांनीही शुभेच्छा दिली आहे. “आई वाघीण आणि लेक रणरागिणी”अभिनंदन हो दोघींचे पण.. अशी कमेंट एका युजरने केली आहे.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटातील कलाकार व संपूर्ण टीमने सक्सेस पार्टी केली. या पार्टीत सर्व कलाकारांनी धमाल मस्ती केल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.