‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री सुकन्या मोनेंनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मालिका, नाटक आणि विविध चित्रपटांमध्ये काम करून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. नुकत्याच त्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात झळकल्या होत्या. सुकन्या मोनेंचे पती अभिनेते संजय मोने देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. या जोडप्याला जुलिया नावाची एकुलती एक मुलगी आहे. गेल्या वर्षभरापासून जुलिया तिचं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला होती. नुकतीच ती सुट्ट्यांनिमित्त भारतात परतल्याने सुकन्या व संजय मोनेंनी लेकीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

जुलियाने अलीकडेच आपल्या आई-बाबांसह राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीला जुलियाच्या संगोपनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर सुकन्या मोने म्हणाल्या, “माझ्या मुलीला सांभाळायला २४ तास दुसरी बाई असेल किंवा नॅनीवर सर्व जबाबदारी सोपवून आपण निर्धास्त राहायचं हे दृश्यचं मला पटत नाही. जुलिया झाली तेव्हा माझ्या सासूबाई ७५ वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करणार?”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

हेही वाचा : लग्नात Lafdi हॅशटॅग का वापरला? गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकरने पहिल्यांदाच सांगितलं कारण; म्हणाले…

सुकन्या मोने पुढे म्हणाल्या, “सासूबाईंप्रमाणे माझ्या आईचं वय देखील जास्त होतं. त्यामुळे एका क्षणाला मी असं ठरवलं होतं की, जर या सगळ्या गोष्टी नाही जमल्या, तर मी काम सोडून घरात बसेन. जसं जमेल तसं आपण जगूया कारण, माझ्या मुलीने दोन हातांनी पोळी तोडली तर मला चालणार नाही. याशिवाय ती उजव्या हाताने पाणी प्यायली तर मला आवडणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार मी आधीच केली होता.”

हेही वाचा : “प्रभू राम मांसाहारी, शंकरानेही मटण..”, ‘या’ वादग्रस्त संवादांमुळे अन्नपूर्णी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, तक्रार दाखल

“बाळाला आम्ही आमच्या आनंदासाठी जन्माला घातलं होतं. त्यामुळे तिला वेळ देणं हे गरजेचं होतं. माझी लेक, तिला वेळ देणं ही तेव्हा माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी होती. आम्ही त्या दिवसांत एकत्र काम केलं नव्हतं. संजय मला म्हणाला होता की, तुला जास्त काम मिळत असेल, तर बिनधास्त बाहेर जा…मी घराकडे आणि तिच्याकडे लक्ष देईन.” असं सुकन्या मोनेंनी सांगितलं.