केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भाई देवा’ हा सिनेमा अजूनही सिनेमागृहात तग धरून आहे. कोणताही सिनेमा हा कथा, अभिनय आणि दिग्दर्शनावर अवलंबून असतो. या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तमरित्या झाली की सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतो. याचं सध्याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. या सिनेमाचा जलवा अजूनही कायम आहे. नुकतीच सिनेमातील कलाकार मंडळींनी ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. यासंबंधित केदार शिंदेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Madhuri Dixit
बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पनवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”

‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात ‘बाईपण भारी देवा’ सिनेमातील अभिनेत्री वंदना गुप्ते, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे उपस्थित राहिले होते. यासंबंधित फोटो केदार शिंदेंनी सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे की, “काल ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात ‘बाईपण भारी देवा’च्या टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी ‘सैराट’ या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शो साठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो. मात्र, हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. ‘बाईपण भारी देवा’चं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रतापचं ‘हे’ खास नातं माहितेय? जाणून घ्या

केदार शिंदेंच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी लिहिलं की, “तुझा खूप अभिमान आहे.” तर गायिका सावनी रविंद्रनं लिहिलं आहे की, “अभिमानास्पद क्षण आहे.”

हेही वाचा – “…स्टार किड्स वगैरे काही नसतं”; प्रिया बेर्डेंनी सांगितला इंडस्ट्रीतला धक्कादायक अनुभव, म्हणाल्या, “अभिनयला…”

दरम्यान, सध्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची १०० कोटींकडे घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत या सिनेमानं ७६.०५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader