केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतेच ५० दिवस पूर्ण झाले. अजूनही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ कायम आहे. लवकरच सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल. तत्पूर्वी या चित्रपटाच्या टीमनं ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात हजेरी लावली. आणि या सुद्धा मंचावर मंगळागौर गाण्यावर ठेका धरण्यात आला; याचा सध्या व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेनं प्रेक्षकांचा घेतला निरोप; नेटकरी म्हणाले, “फार दुःख…”

अलीकडेच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टीमबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत, सोनालीनं या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोनालीबरोबरचा फोटो सोशल मीडियावरील स्टोरीवर शेअर केला आहे. तसेच तिचं कौतुक देखील केलं आहे.

हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”

केदार शिंदे यांनी या फोटोच्या खाली लिहिलं आहे की, “आम्ही २००४ नंतर पहिल्यांदाच भेटलो..पण ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला, त्यावरून त्यांचा मोठेपणा दिसून येतो. आपल्याकडे एखाद्या यशाने हुरळून जाणारी मंडळी पाहिल्यावर हे जाणवतं.”

हेही वाचा – “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

दरम्यान, केदार शिंदे यांच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटात ‘छम छम करता’ या आयटम साँगवर सोनाली बेंद्रे थिरकताना दिसली होती. फराह खाननं या गाण्याला कोरिओग्राफ केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva director kedar shinde praised bollywood actress sonali bendre pps