‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता या चित्रपटातील एका अभिनेत्रीने एका खास कारणासाठी दुसऱ्या अभिनेत्रीचे आभार मानले आहेत.
या चित्रपटाचं प्रेक्षक आणि मनोरंजन सृष्टीतील इतर कलाकार भरभरून कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटातीलच कलाकार एकमेकांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम व्यक्त करत आहेत. आता या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकरने या चित्रपटासाठी गीतलेखन केलेल्या अभिनेत्री अदिती द्रविडचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीच्या खऱ्या आयुष्यातील पाच बहिणींना पाहिलंत का? फोटो शेअर करत दीपा म्हणाली…
अभिनेत्री आदिती द्रविड हिने या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं लिहिलं आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री शिल्पा नवलकरने अदिती द्रविड आणि तिच्या आजीचा ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर नाच करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “या चित्रपटातील तुझ्या सुंदर योगदानासाठी तुझे खूप खूप आभार!” तर त्यावर अदितीने उत्तर देत लिहिलं, “ताई, तुम्हा सगळ्यांच्या कामापुढे माझा अगदीच खारीचा वाटा आहे.”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/shilpa-.jpg?w=314)
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची अमृता खानविलकरला भुरळ, अभिनेत्रीने केदार शिंदेंना दिलं खास गिफ्ट, पाहा झलक
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. तर एका आठवड्यामध्ये या चित्रपटाने १२ कोटींहून अधिक कमाई केली आहे.