‘बाईपण भारी देवा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अभिनेत्री सुकन्या मोने लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील सुकन्या यांची साधना काकडे भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस उतरली. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटातून त्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीमसाठी नुकताच सुकन्या मोनेंनी गरमागरम कांदाभजीचा बेत केला होता. त्यासंबंधित व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाली, “खरंच…”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

एबीसी क्रिएशन्स निर्मित ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगला लंडनमध्ये दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. यासंबंधित फोटो सुकन्या मोनेंनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांनी चित्रपटाच्या टीमबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, सुकन्या मोने ‘इंद्रधनुष्य’ चित्रपटाच्या टीमबरोबर कांदाभजी बनवताना दिसत आहेत.

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

सुकन्या मोनेंच्या या व्हिडीओखाली काही कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनं प्रतिक्रियेत लिहिलं की, ‘कमाल…मस्त झाली होती भजी.’ तर अभिनेत्री ऋजुता देशमुखनं लिहिलं की, ‘शूट करताय ना?’

हेही वाचा – ‘पानिपत’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज दिला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं; अशी झालेली ऑडिशन

दरम्यान, ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटामध्ये सुकन्या मोनेंसह अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. एक पुरुष आणि सात बायकांच्या कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पांडुरंग जाधव सांभाळत आहेत. या चित्रपटाच्यानिमित्तानं पहिल्यांदाच स्वप्नील जोशी लंडनमध्ये शूटिंगचा अभुनव घेत असल्याचं म्हंटलं जात आहे.

Story img Loader