केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत कोटींचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजच्या घडीला ५० दिवस उलटून गेल्यावरही ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाचे कथानक, मंगळागौरीचे खेळ यामुळे असंख्य स्त्रियांना हा चित्रपट त्यांच्या जवळचा वाटला. नुकताच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी या मंगळागौरीच्या खेळाच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “रक्ताने माखलेला शर्ट, बूटात राहिलेली माती अन्…”, समीर वानखेंडेच्या कामाचा पत्नी क्रांती रेडकरला अभिमान; म्हणाली, “ड्रग्जविरोधात…”

अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात सहा बहिणींपैकी केतकीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींना मंगळागौरीच्या प्राथमिक फेरीत सहभागी होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या बहिणी नाराज होऊन रेल्वे स्थानकावर वेस्टर्न डान्स करणाऱ्या तरुण मुला-मुलींना मंगळागौरीची झलक दाखवतात असा सीन एक चित्रपटात आहे. या सीनच्या शूटिंगदरम्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने नुकताच शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : दिशा पाटनीच्या कथित बॉयफ्रेंडने हातावर काढला तिच्या चेहऱ्याचा टॅटू; नेटकरी म्हणाले, “आता टायगर श्रॉफ…”

‘बाईपण भारी देवा’च्या शूटिंगच्या पडद्यामागचा व्हिडीओ अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्या लिहितात, “बाईपण भारी देवा- Behind the scenes… आमची असिस्टंट कोरिओग्राफर थांबली आणि फुगड्या सुरू झाल्या तिथे हा शॉट कट झाला असणं अपेक्षित होतं… पण त्यानंतरचा आमचा उत्साह बघा…” अर्थात शॉट कट झाल्यावरही उत्साहाने या अभिनेत्रींनी डान्स केल्याचे शिल्पा नवलकर यांनी या व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

हेही वाचा : Video: सुयश टिळकने केलं सुप्रिया पाठारे यांच्या लेकाच्या नवीन हॉटेलमध्ये जेवण, चवीबद्दल म्हणाला, “याआधी मी कधीच…”

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “किती वाजता shoot केला होता हा सीन, कारण मुंबई मधल्या गर्दीत असं शूटिंग करायचे , म्हणजे खूप अवघड” असा प्रश्न विचारला आहे. तर, आणखी एका युजरने “असेच BTS व्हिडीओ शेअर करत जा…आम्हाला पाहायला आवडेल” असे म्हटले आहे. दरम्यान, सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तब्बल ७६.०५ कोटींचा गल्ला जमवून मराठी कलाविश्वात नवा रेकॉर्ड केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva fame shilpa navalkar shared behind the scenes video from shooting set sva 00
First published on: 21-08-2023 at 12:07 IST