गेल्या आठवड्यात ‘बाईपण भारी देवा’, ‘सत्यप्रेम की कथा’ आणि ‘कॅरी ऑन जट्टा ३’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या तीन चित्रपटांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली त्याचा आकडाचा समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.

Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Visit Temple
Video : लग्नानंतर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला निघाले देवदर्शनाला; नागार्जुन होते सोबतीला, व्हिडीओ आला समोर
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष
kangana rananut call vikrant massey cockroach
एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

आणखी वाचा : “ती किती कुसक्यासारखी माझ्याशी वागते…,” केदार शिंदेंनी शिल्पा नवलकरसाठी केलेली पोस्ट चर्चेत

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. ‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने १ कोटींची कमाई केली, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचे कमाईमध्ये दुप्पट वाढ झाली. शनिवारी या चित्रपटाने २.१० कोटी कमावले. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल या चित्रपटाने २.८० कोटींचा गल्ला जमवला. तर पहिल्या वीकएण्डला या चित्रपटाने एकूण ५.९० कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून लोकप्रिय मराठी स्टारकिड करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण, तुम्ही तिला ओळखलं का?

तर आज म्हणजेच सोमवारीदेखील चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याचबरोबर सोशल मीडियावरूनही प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत इतरांना हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन करत आहेत.

Story img Loader