‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’चे कथानक हे महिलांच्या जीवनावर आधारित असल्याने प्रत्येक अभिनेत्रीच्या लूकसाठी खास मेहनत घेण्यात आली आहे. या चित्रपटासाठी वेशभूषेची संपूर्ण जबाबदारी युगेशा ओमकार हिने सांभाळली होती. यापूर्वी युगेशाने ‘महाराष्ट्र शाहीर’साठी सुद्धा काम पाहिले होते.
हेही वाचा : दीपिका पदुकोणबरोबर खास फोटो शेअर करून रणवीर सिंहने मानले चाहत्यांचे आभार, कारण…
अलीकडेच केदार शिंदेंनी युगेशाचे कौतुक करत खास पोस्ट शेअर केली होती. यानंतर युगेशाने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीचा लुक कसा ठरवला याबाबत माहिती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात वंदना गुप्ते यांनी नेसलेल्या प्रत्येक साडीची सध्या चर्चा होताना दिसते. या साड्यांचे रंग, वंदना गुप्तेंची वेशभूषा कशी ठरवली याबाबत युगेशाने खास व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे.
हेही वाचा : “तिच्यासाठी मुलं तासन् तास…”, अभिनेत्री विद्या बालनने सांगितला मलायका अरोराच्या कॉलेजच्या दिवसांमधील किस्सा
युगेशा यात म्हणते, “वंदना गुप्तेंने चित्रपटात ‘शशी’ हे पात्र साकारले आहे. हौशी, कामावर जाणारे, स्वतंत्र, बिनधास्त असे शशीचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे चित्रपटात त्यांच्या साड्या सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या, सर्वात वेगळ्या आणि सुंदर असाव्यात अशी माझी मनापासून इच्छा होती. यासाठी मला माझ्या काकू कल्पना यांची मदत झाली. त्यांच्याकडे वंदना मावशीच्या शशी व्यक्तिमत्वाला शोभतील अशा छान साड्या होत्या. यामुळे मला एक अंदाज आला. त्यानुसार मी ‘शशी’ पात्राच्या वेशभूषेसाठी मेहनत घेतली. “
युगेशा पुढे सांगते, “शशीच्या साड्यांसाठी लोकांना पाहताक्षणी लगेच आवडतील असे रंग मी निवडले होते. जेणेकरून या स्वतंत्र, हौशी भूमिकेला त्या साड्या सुंदर दिसतील. प्रत्येक रंग निवडताना भूमिकेची गरज पाहून मी निवडला होता. विशेषत: शशी जेव्हा तिच्या मुलीच्या घरच्या एका कार्यक्रमाला साडी नेसून जाते तेव्हा पण तिने साधी आणि तिला शोभेल साडी नेसलेली असते. त्यानंतर चित्रपटात या पारंपरिक साड्यांमधून ती ड्रेसकडे कशी वळते हे पाहायला मिळेल.”
“शशी आणि तिची मुलगी चिनू यांच्यामधील अंतर अधोरेखित करण्यासाठी मी दोघींनाही नेहमी वेगवेगळ्या रंगाचे कपडे दिले होते. शशीने नेसलेल्या प्रत्येक साडीच्या रंगामागे खास विचार करून तिला या साड्या देण्यात आल्या होत्या. फक्त शेवटी जेव्हा शशी चिनूला मिठी मारते तेव्हा दोघींच्या कपड्यांचे रंग आणि मन एकमेकांना मॅच होते असे मला दाखवायचे होते.” एकंदर वंदना मावशीसाठी काम करून खूप आनंद झाला असल्याचे युगेशा ओमकार हिने सांगितले.