दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १७ दिवसात ५४ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं एका चिमुकलीने गायलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील सर्वच गाणी सोशल मीडियावर हिट झाली आहेत. याच चित्रपटात शेवटी असणारे ‘मंगळागौर’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजताना दिसत आहे. या गाण्यावर अनेक सोशल मीडिया स्टार व्हिडीओ बनवताना दिसत आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”
नुकतंच कॅनडामध्ये राहणाऱ्या एका अडीच वर्षाच्या चिमुकलीने ‘मंगळागौर’ हे गाणं म्हटलं आहे. रिया बोरसे असे या चिमुरडीचं नाव आहे. रियाने या गाण्यातील एक कडवं म्हटलं आहे. यात तिचे बोबडे बोल ऐकून अनेकजण तिच्या गाण्याच्या प्रेमात पडले आहेत.
रियाचे हे गाणं ऐकून गायिका सावनी रविंद्र यावर कमेंट केली आहे. किती छान, मस्तच, अशी कमेंट सावनीने या व्हिडीओवर केली आहे. तर अभिनेत्री अदिती द्रविडने कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. किती सुंदर गाणं गातेय ही, फारच मस्त, असे अदिती द्रविडने म्हटले आहे.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझने पहिल्यांदाच दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान ‘मंगळागौर’ हे गाणं सावनी रविंद्रने गायलं आहे. तर या गाण्याच्या ओळी अदिती द्रविडने लिहिल्या आहेत. सध्या हे गाणं चांगलंच हिट ठरताना दिसत आहे.