‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच या चित्रपटातील एका अभिनेत्रीने गॉसिप्सबद्दल थेट भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिल्पा नवलकर हिने बाईपण भारी देवा या चित्रपटात केतकी हे पात्र साकारलं आहे. तिच्या पात्राचे सर्वत्र कौतुकही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाला बायका पुरुषांपेक्षा जास्त गॉसिप्स करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने बायकांपेक्षा पुरुष जास्त गॉसिप करतात, असे उत्तर दिले.
आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“बाई आणि गॉसिप्स यांचा घनिष्ट संबंध असतो, असं म्हटलं जातं. पण मला असं अजिबात वाटत नाही. चार पुरुष एकत्र आले तर त्यांच्यात जास्त गॉसिप्स होतात. आमच्या नवऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असतं. बायका विनाकारण बदनाम झाल्या आहेत”, असे ती म्हणाली.

“आम्ही सहाजणी जेव्हा एकत्र असायचो, गप्पा मारायचो. तेव्हा आम्ही सहाजणी सातव्या माणसाबद्दल बोलायचो नाही. आम्ही आमच्याबद्दलच बोलायचो. एखाद्या घटनेवर विविध मत मांडायचो. तू ही भाजी कशी बनवते, फोडणी कशी देते, यावर गप्पा मारतो. त्यामुळे आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये गप्पा मारत असतो. गॉसिप्स खरंच होत नाही. पण तेच जेव्हा दोन पुरुष बसतात, तेव्हा ते तिसऱ्या माणसाबद्दलच बोलतात”, असेही शिल्पाने सांगितले.

आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला भारतासह परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने १७ दिवसात ५४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर अमेरिकेत १०० हजार डॉलर्सची कमाई केली आहे.