‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ५४ कोटींची कमाई केली आहे. सध्या प्रत्येक घरात बाईपण भारी देवा चित्रपटाची गाणी, डायलॉग हिट ठरत आहेत. या चित्रपटाने परदेशातही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्री शिल्पा नवलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने अमेरिकेत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कशी क्रेझ आहे, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने अमेरिकेत इतिहास रचला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने अमेरिकेत १०० हजार डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनानुसार या चित्रपटाने ८२ लाख १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली आहे. शिल्पाने नमस्कार करतानाचे इमोजी पोस्ट करत याला कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

शिल्पाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. शिल्पाच्या या पोस्टवर सुकन्या मोनेंनी ‘मनःपूर्वक आभार सगळ्यांचे’, अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा देशमुखने ‘कमाल इतिहास’ असे कमेंट करताना म्हटले आहे.