दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी निर्माते निखिल साने यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

केदार शिंदे यांनी निखिल साने यांचा खास फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे. निखिल साने आणि केदार शिंदे हे गेल्या २२ वर्षांपासून एकमेकांचे खास मित्र आहेत.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”

Kalki 2898AD
‘कल्की 2898 एडी’च्या दिग्दर्शकाचा प्रेक्षकांना सुखद धक्का; प्रभास, बिग बींसह दिसला ‘हा’ सुपरस्टार
chandu champion film War Hero to Paralympic Champion, Murlikant Petkar, From War Hero to Paralympic Champion Murlikant Petkar Petkar, Murlikant Petkar s Journey Celebrated in Chandu Champion film, chandu Champion film based on Murlikant Petkar
सैनिकाच्या संघर्षाची कहाणी जगासमोर आल्याचा विलक्षण आनंद! ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे नायक मुरलीकांत पेटकर यांची भावना
Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुळजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Kolhapur, Protestors Demand Ban on Maharaj film, Protestors Demand Ban on Aamir Khan s Son Junaid Khan s Film Maharaj , Defaming Hindu Saints, marathi news, kolhapur news,
आमिर खानचा मुलगा प्रदर्शनापूर्वी गाजू लागला; ‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
govinda net worth
चित्रपटांपासून दूर तरीही ऐशोआरामात जगतो गोविंदा, कसे कमावतो कोट्यवधी रुपये, एकूण संपत्ती किती? जाणून घ्या
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Janhvi Kapoor, fan,
जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक
Raj Kapoor death anniversary
Raj Kapoor : ‘..पर हम तुम्हारे रहेंगे सदा!’ जिंदा दिल राज कपूरना आठवताना

केदार शिंदे यांची पोस्ट

“काही नाती परमेश्वर ठरवतो. कोणत्या वळणावर ती एकमेकांच्या समोर येतील आणि किती काळ टिकतील? हे सुध्दा त्यांनी ठरवलेलं असत. निखिल आणि माझी मैत्री ही २००१ पासूनची. तो माझा executive producer होता. जेव्हा झी मराठी हे अल्फा मराठी होतं. हाऊसफुल्ल, हसा चकटफू असे कार्यक्रम मी त्याच्या सोबत केले. ती मैत्री तेव्हापासून आत्तापर्यंत टिकून आहे.

तो कमाल आहे. आणि त्याचं व्हिजन अफाट आहे ते त्याने आत्तापर्यंत सिध्द केलं आहे. सैराट, कट्यार, नटसम्राट, नटरंग असे कित्येक माईलस्टोन त्याच्या नावे आहेत. आज “बाईपण भारी देवा” धडाक्यात चालतय त्यामागे याच माणसाचं व्हीजन आहे. या सिनेमाच्या कल्पनेपासून तो संबंधित होता. पण तेव्हा एका चॅनलमध्ये तो काम करत असल्याने, आणि चॅनल सिनेमा घेण्याकरीता असमर्थ असल्याने तो शांत होता.

ज्याक्षणी jiostudiosmarathi content head झाला तेव्हा लागलीच त्याने हा सिनेमा आपल्या हाती घेतला. गेली दोन वर्षे जेव्हा हा सिनेमा येत नव्हता, त्यावेळी त्याच्या चेहेऱ्यावर असलेला ताण मी विसरू शकत नाही. सिनेमा प्रदर्शित करण्याचं सगळं डोकं त्याचं. प्लॅनिंग त्याचं. आजच यश सुध्दा त्याचं. पण तरीही अस्वस्थ आहेत तो, कारण त्याला पक्क ठाऊक आहे.. अजून या सिनेमाने खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याची टीम एकदम त्याच्या सारखीच. Charged. श्री स्वामी समर्थ महाराज की जय”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार एका भागासाठी किती मानधन घेतात? जाणून घ्या

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे.