‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वत्र चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच त्यांनी या गाण्याच्या गायिकांसाठी स्पेशल पोस्ट केली आहे.

बाईपण भारी देवा या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील टायटल साँग, ‘मंगळागौर’ ही गाणी हिट झाली आहेत.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

केदार शिंदेंची पोस्ट

बाईपण भारी देवा मध्ये खरतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॅांग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. “उघड्या पुन्हा जाहाल्या”. नवॅ गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी . कमाल गायलय.

आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच.. आणि… शेवटचं गाणं. “मंगळागौर” ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कम्माल गायली आहे.

त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटर मध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमा साठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे, असे केदार शिंदेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.