दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली, याचा आकडा समोर आला आहे. केदार शिंदे यांनी एक पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.

केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात त्यांनी या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली, याबद्दल सांगितले आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
आणखी वाचा : Video : “फक्त बायकांचा चित्रपट…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पुरुषांनी…”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा

त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

“ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहे. तसेच अनेकजण इतरांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचं आवाहनदेखील करत आहेत.

Story img Loader