सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणदणीत कमाई करताना पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेते आदेश बांदेकर यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांच्या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटातील तिचा लूक कसा ठरवण्यात आला, याबद्दल एक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी अनेक वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. या चित्रपटात त्या पल्लवी काकडे हे पात्र साकारत आहेत. या चित्रपटात तिने अगदी वेगळी भूमिका साकारली आहे. यात तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवलं आहे. या चित्रपटाची वेशभूषा साकारणारी युगेशा ओंकार हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “पोरी मला इच्छामरणही चालेल, पण…” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मांडली व्यथा, अंकिता म्हणाली “मी सिनेसृष्टीपर्यंत…”

“मी जेव्हा स्क्रिप्टमधील पल्लवीचं पात्र वाचलं, तेव्हाच तिचा लूक माझ्या डोक्यात ठरवला होता. तिच्या वैवाहिक आयुष्यात असलेल्या समस्यांमुळे तिला खूप छान किंवा तरुण दिसायचं होतं. त्यामुळे मी खूप बोल्ड आणि चौकटीपलीकडे जाऊन तिला कपडे देण्याचा ठरवलं”, असे युगेशाने म्हटलं.

यात तिचा मेकअपही बोल्ड आहे. तिने केसांना रंगही दिला आहे. विशेष म्हणजे पल्लवीच्या गळ्यात मंगळसूत्र फारच खास आहे. त्यात तिच्या गळ्यात तिने ए नावाचं इंग्रजी लेटर घातलेलं असतं. ए म्हणजे अनिरुद्ध तिच्या नवऱ्याचं नाव आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

मी जेव्हा पल्लवीची वेशभूषा ठरवत होती, तेव्हा मला फार दडपण आलं होतं. कारण पल्लवीची वेशभूषा आणि सुचित्रा बांदेकरांचा लूक हा अगदी विरुद्ध आहे. केसांना लाल किंवा गुलाबी रंग द्यायचा हे तिच्यासाठी फारच जास्त होतं, असेही तिने सांगितलं.

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट दणदणीत कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता. त्यानंतर पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva suchitra bandekar designer yugesha omkar reveled about her look nrp