अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्यातच आता सुचित्रा बांदेकरांनी सूनेबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकार उपस्थित होते. यादरम्यान केदार शिंदे यांनी सोहमला चित्रपटातील एका सीनबद्दल विचारले. त्यावर सुचित्रा बांदेकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा : बजेट फक्त ५ कोटी, कमाई मात्र दहापट; ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांनी पल्लवी काकडे ही भूमिका साकारली आहे. याच चित्रपटात सोहम हा पल्लवीचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोहम हा परदेशात शिकण्यासाठी गेलेला असताना तो त्याच्या आईला फोन करतो. यावेळी सोहमबरोबर एक मुलगी असते आणि तो आईला तिची ओळख करुन देतो. यानंतर सुचित्रा बांदेकर या तिला हाय हॅलो करतात.

या सीननंतर अनेकांनी ती ‘सोहमची होणारी बायको’, ‘बांदेकरांची सून’ असल्याचे म्हटले होतं. काहींनी तर ‘वहिनींना नमस्कार’ अशाही कमेंट केल्या होत्या. मात्र यावर केदार शिंदेंनी नुकतंच स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

“या चित्रपटात झळकलेली ती अभिनेत्री सोहमची गर्लफ्रेंड नाही. तिचा आणि सोहमचा काहीही संबंध नाही. ती फक्त एक परदेशी अभिनेत्री होती”, असे केदारने यावेळी सांगितलं. यानंतर सुचित्रा बांदेकरांनी “मला तशी सून चालेल”, असे यावेळी म्हटले.

सुचित्रा बांदेकरांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्वजण हसायला लागले. यावेळी केदार शिंदेंनी सोहमच्या अभिनयाचं कौतुक केले. तसेच त्याला एका चित्रपटाची ऑफरही दिली. त्यामुळे सोहम बांदेकर लवकरच आणखी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.