केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या घवघवीत यशानंतर अलीकडेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पार्टीचे आयोजन केले होते. चित्रपटाच्या अभिनेत्री, त्यांनी पडद्यावर केलेले अभिनय याशिवाय एवढा सुंदर चित्रपट कोणी लिहिला असेल? अशी चर्चा रंगली सर्वत्र रंगली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा वैशाली नाईक हिने लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी केदार शिंदेंनी तिचे कौतुक करत खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा : भूमी पेडणेकरने गोव्यात सुरु केलं आलिशान KAIA रेस्टॉरंट, नावात दडलाय खास अर्थ
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा कशी सुचली? याबद्दल वैशालीने अलीकडेच ‘एबीपी माझा’ दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. वैशाली म्हणाली, “ही कथा मी माझी आई सेवानिवृत्त झाल्यावर २०१८ मध्ये लिहिली होती. माझ्या आईच्या खूप बहिणी आहेत त्यामुळे मला ही कथा सुचली. लहानपणापासून मी त्यांचे असंख्य किस्से ऐकले होते. आई मूळची गिरगावची असल्याने मला परंपरा, सण याविषयी माहिती होते. पण माझ्या आईची मंगळागौर कधीच झालेली नव्हती.”
वैशाली पुढे म्हणाली, “आईची मंगळागौर झाली नसल्याने ती नेहमी माझ्या बाबांना टोमणे मारायची. आई सेवानिवृत्त झाल्यावर तिच्यासमोर प्रश्न होता आता पुढे करायचे? आईसारख्या त्या विशिष्ट वयातील बायकांना एका काळानंतर वाटू लागते आता आपली गरज कोणालाच नाही. आईमुळे या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि माझ्या जीवनप्रवासात मला ‘बाईपण…’ ची कथा सुचली.”
हेही वाचा : सारा अली खानने खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, “जगाला सांगते…”
“ओमकार, केतन, निकिता यांच्याबरोबर बसून ही कथा मी पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील आई, आजी, मावशी यांचे अनुभवही या कथेत उतरले आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबातील किस्से यामध्ये तुम्हाला दिसतील.” असे वैशाली नाईकने सांगितले.