सोनाली कुलकर्णी, भरत जाधव यांचा ‘बकुळा नामदेव घोटाळे’ चित्रपट तुम्हाला आठवतो का? बरोबर १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बकुळा हे पात्र साकारत सोनालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. तर भरत जाधव यांनी साकारलेलं सरपंच घोटाळे हे पात्र तर त्यावेळी प्रचंड गाजलं. आजही प्रेक्षकांना हा चित्रपट लक्षात आहे. त्याचबरोबरीने भरत जाधव, सोनाली कुलकर्णीने या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. याबाबतच आता भरत जाधव यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सोनालीनेही इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने चित्रपटाच्या दरम्यानचा अनुभव आणि आपल्या करिअरची सुरुवात कशी झाली? याबाबत सांगितलं. आता भरत जाधव यांनीही खास पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भरत जाधव यांची खास पोस्ट
“१५ वर्षांपूर्वी जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा घोटाळेच्या लूकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की नंतर या पात्राला इतकं अमाप प्रेम मिळेल. युट्यूबवर कमेंट्समध्ये घोटाळे या पात्रासाठी लोकं भरभरून कमेंट करतात.”

आणखी वाचा – ‘बिग बॉस ४’ मराठीच्या स्पर्धकांवर भडकल्या अभिनेत्री सुरेखा कुडची, म्हणाल्या, “ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे…”

“घोटाळेच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोकं तितकंच एण्जॉय करतात. याचं कलाकार म्हणून विलक्षण समाधान वाटतं. या यशाचं सारं श्रेय संपूर्ण टीमचं आणि लेखक दिग्दर्शक केदार शिंदेचं. १५ वर्ष झाली. आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या. भकासपूर वाट पाहतोय.” असं भर जाधव यांनी पोस्ट द्वारे म्हटलं आहे. आम्हाला या चित्रपट आजही आठवतो अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी भरत जाधव यांची पोस्ट पाहून दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bakula namdev ghotale sonalee kulkarni bharat jadhav marathi movie complete 15 years actor share special post on instagram see details kmd