Supriya Patahre Birthday: मराठी चित्रपट व टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे या त्यांच्या उत्तम अभिनयासाठी ओळखल्या जातात. पण, एकदा त्यांना एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना तीन महिने राजस्थानमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. या धक्कादायक अनुभवाचा खुलासा खुद्द सुप्रिया यांनी काही महिन्यांपूर्वी ‘महिला सुरक्षा परिसंवादा’दरम्यान केला होता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा किस्सा जाणून घेऊयात.

Video: “ही गोष्ट माझ्या मनामध्ये…”; मिलिंद गवळींनी सुप्रिया पाठारेंबरोबरचा २२ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली खंत

सुप्रिया म्हणाल्या होत्या की, “१९९५मध्ये एक निर्माता चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती. हे तीन महिने बंदुकीची भिती दाखवून माझ्याकडून त्याने अभिनय करवून घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरून बोलण्याची परवानगी दिली होती. पण, मराठीत बोलण्यास बंदी घातली होती. मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा प्रयोग करून माझ्या बहिणीला आपल्या स्थितीबद्दल सांगितलं. मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागितली.”

सुप्रिया यांना बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली होती. “कुटुंबियांच्या तक्रारीनंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. २० तासांचा प्रवास करुन मी सुखरूप सुरतला पोहोचले. याकरिता मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन,” असे सुप्रिया तो अनुभव सांगत म्हणाल्या होत्या.

Story img Loader