मराठी सिनेविश्वात गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. शाल्व किंजवडेकर, अभिषेक रहाळकर, किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर, रेश्मा शिंदे, शिवानी सोनार- अंबर गणपुळे या कलाकारांनंतर आणखी एका अभिनेत्रीने लग्न केलं आहे. ‘अकिरा’ फेम या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
‘बलोच’ या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री तेजश्री जाधव लग्नबंधनात अडकली आहे. तेजश्रीने बॉयफ्रेंड रोहन सिंगबरोबर २६ जानेवारीला लग्न केलं. तिच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. तेजश्रीने लग्नात निळ्या काठांची केशरी नऊवारी नेसली होती. तर रोहनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व निळे धोतर असा लूक केला होता. रोहन व तेजश्रीच्या लग्नात कुटुंबीय व काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
पाहा फोटो –

तेजश्रीने १४ मार्च २०२४ रोजी रोहन सिंगबरोबर साखरपुडा केला होता. रोहनने तिला साखरपुड्याच्या काही दिवसांआधी समुद्रकिनारी प्रपोज केलं होतं. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने त्यांनी साखरपुडा केला. साखरपुडा केल्यानंतर जवळपास १० महिन्यांनी त्यांनी लग्नगाठ बांधली. तेजश्रीचा पती रोहन हा बँकर आहे. तो न्युझीलंडमध्ये राहतो. तेजश्री व रोहन यांना या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.
तेजश्री जाधवबद्दल बोलायचे झाल्यास तिने २०१६ मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘अट्टी’ या तामिळ चित्रपटात झळकली होती. यानंतर ती ‘माधुरी टॉकीज’, ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्री ही ‘बलोच’ या मराठी चित्रपटातही झळकली होती. यात तिने तानाबाईंची भूमिका साकारली होती. तेजश्री ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.