सध्या मराठी चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. नुकताच अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाची हवा आहे. या चित्रपटाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. चित्रपटाचा टिझरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. हा चित्रपटाचं नव्हे तर राज ठाकरे यांनी याआधीदेखील एका मराठी चित्रपटाला आपला आवाज दिला होता.

राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली, त्यांचे भाषण, मराठी भाषेवरचे प्रेम आज जनताजनार्दन जाणून आहे. त्यांचा आवाज, भाषण ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी असते. त्यांनी आवाज केदार शिंदे यांच्या ‘जत्रा’ चित्रपटाला आवाज दिला होता. २००६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या . सुरवातीला आणि शेवटी राज ठाकरे यांचा आवाज आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून बघतात. या चित्रपटाचेच लेखन, दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके असे नामवंत कलाकार होते.

Shalini Pandey reacts on Maharaj intimate scene with jaideep ahlawat
‘महाराज’ चित्रपटातील सेक्स सीनबद्दल शालिनी पांडे म्हणाली, “मी तो सीन केला आणि अचानक…”
Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता
film industry Composer Madanmohan birth centenary
एक होता गझलवेडा संगीतकार!
Marathi actor Kailash Waghmare sing Jamoore song of Chandu Champion movie
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम
Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुळजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
bai ga movie first song Jantar Mantar Bai Ga
Video : “जंतर मंतर बाई गं…”, सहा अभिनेत्री अन् एक हिरो! ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
This famous Bollywood actor didn't charge anything for a film
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलं चित्रपटाचं मानधन, म्हणाला, “मला निर्मात्याचं श्रेय…”
Saif Ali Khan had to take sleeping pills while Hum Saath Saath Hain
‘हम साथ साथ है’च्या शूटिंगवेळी सैफ अली खानला पत्नी अमृताने दिलेल्या झोपेच्या गोळ्या, दिग्दर्शकाने केला खुलासा

पार्टीला जाताना एकता कपूर कपड्यावरून झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले,”ख्रिसमस… “

दोन गावांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा बेतली होती. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांनी संगीत दिले होते. या चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणे इतके सुपरहिट ठरले की या गाण्याचा रिमेक हिंदी गाण्यात करण्यात आला होता. हिंदीत ‘चिकनी चमेली’ नावाने गाणे तयार करण्यात आले होते.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने नुकतीच राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शरद केळकरच्या आवाजाचं तोंडभरून कौतुक केलं. चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर देतानाचा अनुभव कसा होता? याबाबतही राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांचे मित्र अभिनेते अजित भोरे यांनी व्हॉईस ओव्हर कसा असला पाहिजे याबाबत सगळं काही राज ठाकरे यांना सांगितले.